केंद्रीय कार्यकारी मंडळ

राष्ट्रपतींची निवड

views

3:28
"राज्यघटनेच्या कलम ५४ व कलम ५५ मध्ये राष्ट्रपतींची निवडणूक पद्धती स्पष्ट केलेली आहे. राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षपणे होते. भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत, तर राष्ट्रपतींची निवड घटकराज्यातील विधानसभेचे निर्वाचित सदस्य व संसदेच्या दोन्ही सभागृहांतील म्हणजे लोकसभा व राज्यसभा सदस्यांकडून निवडले जातात. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला ‘निर्वाचन मंडळ’ असे म्हणतात. राष्ट्रपतींचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो. मृत्यू, राजीनामा किंवा महाभियोगाद्वारे पदभ्रष्टता या कारणांमुळे राष्ट्रपती पद कालावधी पूर्ण होण्याआधी रिक्त होऊ शकते. राष्ट्रपतींची निवडणूक दर पाच वर्षांनी होते. ही निवडणूक एखादया व्यक्तीला कितीही वेळा लढविता येते. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी पुढील पात्रतेची गरज असते:1)ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. 2)तिचे वय 35 वर्षे पूर्ण असले पाहिजे. राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते. त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते, परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रियेला ‘महाभियोग’ प्रक्रिया असे म्हणतात. राज्यघटनेच्या कलम ६१ मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोग चालविण्यासाठी तरतूद स्पष्ट केलेली आहे. ""