केंद्रीय कार्यकारी मंडळ

प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ

views

4:07
भारताचे संविधानात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात. परंतु राष्ट्रपतींच्या हाती नाममात्र सत्ता असते. पण प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवते. म्हणजेच वास्तववादी सत्ताप्रमुख पंतप्रधान असतात. हे आपणास माहीत आहे. प्रधानमंत्रीं कोणती कार्ये व भूमिका पार पाडतात ते आपण आता पाहू. निवडणुकीत ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या असतात, म्हणजेच बहुमत मिळवलेला जो पक्ष असतो, त्या पक्षाला आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची असते. प्रधानमंत्र्याची निवड झाल्यानंतर त्याच पक्षातील आपल्या विश्वासातील सहका-यांची निवड ते मंत्रिमंडळात करीत असतात. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. जर एखादा सदस्य संसदेचा सदस्य नसेल व तरीही त्याची निवड मंत्रिमंडळात झाली असेल तर त्या व्यक्तीस सहा महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवणे गरजेचे असते. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. याचाच अर्थ राज्यकारभाराची वास्तव किंवा खरी सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.