केंद्रीय कार्यकारी मंडळ

मंत्रिमंडळाची कार्ये

views

6:08
भारतीय राज्यघटनेनुसार कलम ७४(१) नुसार राष्ट्रपतींच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुखपदी असणारे एक मंत्रिमंडळ असते व राष्ट्रपती आपली कार्ये पार पडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतात.1) संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायदे निर्माण करण्यात पुढाकार घेते. कायदयांचा आराखडा म्हणजे मसुदा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जाते. मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेते. 2) शिक्षण, शेती, उदयोग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते. मंत्रिमंडळाने ठरविलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते धोरण मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण संसदेच्या मान्यतेशिवाय कोणत्याच धोरणाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. 3) मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी म्हणजे संसदेने मान्यता दिलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे. संसदेने धोरणांना किंवा कायदयाच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करते.