आर्द्रता व ढग

वातावरणातील आर्द्रता

views

5:21
“हवेतील बाष्पाच्या प्रमाणास हवेची आर्द्रता असे म्हणतात.” हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. मुलांनो, हवेची बाष्पधारणक्षमता सर्व ठिकाणी सारखीच असेल असे नाही. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्पधारण करू शकते. गरम हवा असेल तर त्या हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. तर हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणात किंवा क्षमतेत बाष्प धारण करू शकते. या प्रमाणाला किंवा क्षमतेला हवेची बाष्पधारण क्षमता असे म्हणतात. गरम हवेत बाष्पधारण क्षमता तुलनेने अधिक व थंड हवेत बाष्पधारणक्षमता तुलनेने कमी असते. एका विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण समान असेल, तर अशा हवेस बाष्पसंपृक्त हवा असे म्हणतात.