आर्द्रता व ढग

ढगांचे प्रकार

views

4:09
ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेल्या ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहीत अवस्थेत असतात. म्हणजेच ते वजनाने अत्यंत हलके असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत असतात. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेल्या ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहीत अवस्थेत असतात. म्हणजेच ते वजनाने अत्यंत हलके असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत असतात. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक वर्गीकरणानुसार ढगांचे दहा प्रकार आहेत. वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. उंचीनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार करता येतात. हे प्रकार ढगांच्या तळांकडील उंचीवरून ठरत असतात. ढगांची उंची सुमारे ७००० ते १४००० मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही उंची सुमारे २००० ते ७००० मी दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीवरील ढग असे म्हणतात. २००० मी पेक्षा कमी उंचीवरील ढगांना कमी उंचीवरील ढग असे म्हणतात.