आर्द्रता व ढग

करून पहा

views

4:36
आपण आता वर्गातील मुलांचे दोन गट करू. पहिल्या गटाने पहिला प्रयोग करायचा आहे. १) यासाठी प्रथम प्रेशर कुकर घेऊन त्याची शिटी काढून ठेवा. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घ्या. आता प्रेशर कुकरला उष्णता द्या. हँडल असणारे एक झाकण घ्या आता पाणी उकळू लागल्यावर प्रेशर कुकरमधून वाफ बाहेर पडते, तेथे थोड्या अंतरावर झाकण धरा. पाहा, पाणी गरम होऊन उकळू लागल्यानंतर पाण्याची वाफ होताना दिसत आहे. हीच वाफ जेव्हा थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचे पाण्यात रूपांतर होते. त्यामुळे तेथे त्या झाकणावर पाण्याचे थेंब जमा होतात. प्रयोग २) आता हा दुसरा प्रयोग दुसऱ्या गटाने करायचा आहे. यासाठी प्रथम एक सपाट तळ असणारा काचेचा पेला घ्या. नंतर या पेल्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका. आता हा पेला दोन-तीन मिनिटे आहे तसाच ठेवा. मुलांनो, दोन-तीन मिनिटांनंतर आता बर्फाच्या पेल्याचे निरीक्षण करा. पाहा काय दिसते आहे. थोड्याच वेळात पाण्याचे थेंब पेल्याच्या बाहेरच्या भागावर जमा झाल्याचे आढळतात. हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते. आणि पेल्याच्या बाह्यपृष्ठावर पाण्याचे थेंब जमा होतात. तर पहिल्या कृतीत कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब निर्माण झाले असल्याचे दिसले.