सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

व्हिटाकर यांनी अभ्यासलेली सृष्टी

views

5:44
आता आपण व्हिटाकर यांनी सजीवांचे वर्गीकरण कसे केले आहे ते सविस्तर समजून घेऊ या. १) मोनेरा या जीवसृष्टीची माहिती घेऊ. लक्षणे- 1)मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव हे एकपेशीय असतात. 2) या सृष्टीतील सजीव हे स्वयंपोषी म्हणजेच स्वत:चे अन्न स्वत: तयार करणारे किंवा परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अन्नासाठी विसंबून असणारे असतात. 3) हे सजीव आदिकेंद्रकी असतात व यांना पटलबद्ध केंद्रक किंवा पेशीअंगके नसतात. २) प्रोटिस्टा या जीवसृष्टीची माहिती घेऊ. लक्षणे- १) प्रोटिस्टा या सजीव सृष्टीतील सजीव हे एकपेशीय असतात. या पेशींमध्ये पटलबद्ध केंद्रक असते. २) या सृष्टीतील सजीवांना प्रचलनसाठी म्हणजेच स्वत:च्या वेगवेगळ्या जीवनक्रिया पूर्ण करण्यासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. ३) या सृष्टीतील सजीव हे स्वंयपोषी व परपोषी असतात. ४) बहुतकरून ते पाण्यात राहतात. ५) ते दृश्यकेंद्रकी असतात. स्वंयपोषी सजीव म्हणजे युग्लिना व व्ह़ॉल्व्हॉक्स पेशीमध्ये हरितलवके असतात. आणि परपोषी सजीव म्हणजे अमीबा, पॅरामेशिअम, प्लास्मोडिअम इत्यादी सजीव. ही झाली प्रोटिस्टा सृष्टीची लक्षणे. ३) कवक या सृष्टीविषयी माहिती घेऊ. लक्षणे - 1) कवक या सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. 2) जास्तीत जास्त कवके ही मृतोपजीवी असतात व ती कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर आपले जीवन जगत असतात. 3) कवकांची पेशीभित्तिका ही ‘कायटीन’ या जटील शर्करेपासून बनलेली असते. 4) काही कवके ही तंतूसारखी असतात. त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. 5) कवकांमध्ये हरितलवक नसते. म्हणून हे स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकत नाहीत.