सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

views

4:12
आता आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते ते पाहूया. सूक्ष्म म्हणजे अतिशय लहान. सूक्ष्मजीव हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. आपल्या पृथ्वीवर जे सजीव आहेत, त्यात प्रामुख्याने सूक्ष्मजीव हे सर्वात जास्त प्रमाणात आहेत. सूक्ष्म जीवांच्या वर्गीकरणामुळे त्यांचा अभ्यास करण्यास मदत होते. जीवाणू हे मोनेरा सृष्टीतील आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव असतात. त्यामध्ये हरितलवके नसतात. म्हणून ते सेंद्रिय द्रव्यातून अन्न मिळवतात. आदिजीव हे एकपेशीय सूक्ष्मजीव असतात. ते प्रोटिस्टा सृष्टीतील एकपेशीय परंतु दृश्यकेंद्र्की पेशी असणारे सजीव असतात. आदिजीवाचे शरीर हे एकाच पेशीने बनलेले असते व हे जलचर असतात. उदा. अमिबा.