सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

कवके

views

3:46
कवक हे मृतोपजीवी किंवा शवोपजीवी एकपेशीय सजीव असतात. तसेच ते परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी असतात. यांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतका असतो. कवक हे कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राणी यांचे शरीर, कार्बनी पदार्थ यांमध्ये आढळतात. कवके हे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्नशोषण करतात. कायटीन या जटील शर्करेपासून कवकांची पेशीभित्तिका बनलेली असते. कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. कवक या सूक्ष्मजीवांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पदधतीने होते. उदा यीस्ट, कॅन्डीडा, आळंबी (मशरूम).