सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

व्हिटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुण - दोष

views

3:10
व्हिटाकर यांच्या वर्गीकरण पदधतीचे गुण: १) व्हिटाकर यांनी ज्या पदधतीने वर्गीकरण केले ते शास्त्रीय गोष्टींवर अवलंबून आहे. २) आदिकेंद्रकी सजीवांना निरनिराळ्या गटांत वेगळे केले आहे. त्यामुळे आदिकेंद्रकी सजीव हे दुसऱ्या सजीवांपेक्षा वेगळे आहेत हे समजते. ३) सर्व एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केला आहे. त्यामुळे युग्लिनासारख्या एकपेशीय सजीवांचे नेमके वर्गीकरण करणे सोपे झाले. व्हिटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे दोष :- १) मोनेरा व प्रोटिस्टा या दोन्ही सृष्टींतील काही सजीव प्रकाश संश्लेषण करतात. त्यामुळे काही सजीव हे स्वंयपोषी आहेत तर काही परपोषी आहेत. या दोन्ही सृष्टींतील काही सजीवांना पेशीभित्तिका असतात तर काही सजीवांना पेशीभित्तिका नसतात. २) वेगवेगळी लक्षणे दाखविणारे सजीव प्रोटिस्टा या सृष्टीत एकत्र गटात टाकले आहेत. ३) वनस्पती, प्राणी, कवक या तिन्ही सृष्टींत उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सजीवांचा समावेश केला नाही. उदा. प्राणी सृष्टीमध्ये अमिबा या एकपेशीय प्राण्याचा समावेश केला नाही.