महाराष्ट्रातील समाजजीवन

चालीरीती

views

3:14
चालीरीती : याकाळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. मुला – मुलींची लग्ने पाळण्यात किंवा बालवयात लावत असत. तसेच बहुपत्नित्वाची पद्धत होती. म्हणजेच एक पुरुष अनेक पत्नी करू शकत होता. तसेच त्यांना एकत्र नांदवतही होता. काही ठिकाणी विधवांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आढळतात. म्हणजेच त्यावेळी विधवा पुनर्विवाहास मान्यता होती. पुनर्विवाह म्हणजे पहिला पती निधन पावल्यानंतर स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी केलेला विवाह होय. राहणीमान : त्याकाळी बहुसंख्य लोक हे खेडयांत राहत होते. खेडी स्वयंपूर्ण असत. म्हणजे खेडयातील गरजा खेडयातच भागविल्या जात असत. फक्त मीठच त्यांना इतर ठिकाणांहून मागवावे लागत असे. शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित होत्या. शेतकरी शेतामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इ. धान्य पिकवत होते. आपापसातील व्यवहार ते वस्तुविनिमय पद्धतीने करत असत. गावातील घरे साधी, माती-विटांची असत. शहरात एकमजली किंवा दोनमजली वाडे असायचे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असे.