महाराष्ट्रातील समाजजीवन

खेळ

views

3:53
खेळ : या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ हे त्याकाळच्या लोकांचे करमणूक व मनोरंजनाचे साधन होते. कुस्ती व युद्धकला हे खेळ त्याकाळी लोकप्रिय होते. मल्लखांब, दंड, कुस्ती, लाठी, दांडपट्टा व बोथाटी हे खेळ खेळले जात. बोथाटी हा मराठेशाहीतील एक मर्दानी खेळ आहे. हुतुतू म्हणजे कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या हे मैदानी खेळ खेळत. तर सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ हे बैठे खेळ लोकप्रिय होते. गंजिफा हा पत्त्यांचा बैठा खेळ होता. यात १२ संच असत व प्रत्येक संचात १२ पत्ते असे एकूण १४४ पत्ते असत. धर्म व आचार – विचार : त्याकाळी हिंदू व मुस्लिम असे दोन धर्म दिसून येतात. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, कोणावरही आपल्या धर्माची सक्ती करू नये, प्रत्येकाने दुसऱ्या धर्माचा आदर करावा, अशी विचारधारणा त्याकाळच्या समाजाची होती. दोन्ही धर्मातील लोक एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. वारकरी, महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे पंथ त्याकाळी प्रामुख्याने प्रचलित होते. स्त्रियांचे जीवन: या काळातील स्त्रियांचे जीवन हे कष्टाचे होते. स्त्रियांना चूल व मूल या दोन गोष्टी माहीत होत्या. सासर आणि माहेर हेच तिचे जग असायचे. थोडया फार स्त्रियांनीच त्याकाळात अक्षर ओळख, प्रशासन (राज्यकारभार करणे) युद्धकौशल्य यांत प्रगती केली होती.