महाराष्ट्रातील समाजजीवन Go Back शिल्पकला व स्थापत्यकला views 3:36 शिल्पकला व स्थापत्यकला: मुलांनो, इ.स. १६३० ते १८१० ह्या साधारणपणे पावणेदोनशे वर्षांच्या कालखंडाला मराठेशाही म्हणतात. या काळातील लोकजीवनाविषयी आपण माहिती घेतली. आता आपण या कालखंडातील कला-स्थापत्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इ. कठीण पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून आकृती बनविण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस ‘शिल्प’ असे म्हणतात. मूर्ती, पुतळे, अशा स्वरुपात शिल्पे घडविले जातात. शिवाजी महाराजांच्या काळात पुण्यातील कसबा गणपती मंदिराचे दुरुस्तीचे काम झाले. तसेच लाल महालाची उभारणी (पुणे) राजगड व रायगडावरील विविध बांधकामे, सिंधुदुर्ग व पद्मदुर्ग यांसारखे जलदुर्ग किंवा सागरीदुर्ग उभारणीचे उल्लेख येतात. प्रस्तावना चालीरीती सण – समारंभ खेळ शिल्पकला व स्थापत्यकला मंदिरे