महाराष्ट्रातील समाजजीवन

सण – समारंभ

views

4:08
सण – समारंभ : त्याकाळात घरोघरी सण साजरे केले जात असत. त्यामध्ये गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांत, होळी, ईद यासारखे सण – उत्सव असत. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जायचा. तो घरगुती स्वरूपाचा होता. दरवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंतचतुर्दर्शी पर्यंत हा उत्सव चालत असे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने तेव्हापासून शुभकार्याची सुरुवात लोक करायचे. साडेतीन मुहूर्त हे ४ सणांना म्हटले जाते. 1) गुढीपाडवा (वर्ष प्रतिपदा) 2) अक्षय तृतीया 3) विजयादशमी – दसरा हे तीन व बलिप्रतिपदा – म्हणजे दिवाळीतील पाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तातील अर्धा मुहूर्त मानला जातो. शिक्षण : या काळात शिक्षणपद्धतीत पाठशाळा व मदरसा होत्या. लेखन, वाचन व हिशेबाचे शिक्षण व्यक्तीला घरातून मिळे. मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मोडी लिपीत लिहिली आहे. अनेक ऐतिहासिक कागदपत्र मोडीतच आढळतात. दळणवळण प्रवास : घाटमार्ग (बोरघाट, आंबाघाट इ.), सडक म्हणजे रस्ते, नद्यांवरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची. अशा तऱ्हेने त्या काळात दळणवळण व प्रवास होत असे. तो अतिशय संथ गतीने चालत असे.