महाराष्ट्रातील समाजजीवन

मंदिरे

views

5:17
मंदिरे : शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात बांधली गेलेली मंदिरे ही हेमाडपंती पद्धतीची आहेत. उदा. : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे शिखर, ज्योतिबाच्या डोंगरावरील मंदिरे, शिखरशिंगणापूरचा शंभू महादेव, वेरुळच्या घृष्णेश्वराचे मंदिर ही शिल्पशास्त्राची उत्तम उदाहरणे होत. प्रतापगडावरील भवानी देवीचे व गोव्याला सप्तकोटेश्वराचे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले. ही मंदिरे पाहून पूर्वीची स्थापत्यकला किती समृद्ध होती ते आपल्या लक्षात येते. घाट : मुलांनो, नदीवर किंवा दोन किंवा अनेक नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तेथे घडीव दगडांनी घाट बांधलेला दिसतो. दगडी घाट बांधणे हे मराठेशाहीचे वैशिष्ट्य आहे. घाट : मुलांनो, नदीवर किंवा दोन किंवा अनेक नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तेथे घडीव दगडांनी घाट बांधलेला दिसतो. दगडी घाट बांधणे हे मराठेशाहीचे वैशिष्ट्य आहे. चित्रकला : पेशवे काळात बांधलेल्या पुण्याच्या शनिवार वाडयाच्या भिंतीवरील चित्रे महत्त्वाची आहेत. पेशव्यांच्या काळात पुणे, सातारा, मेणवली, नाशिक, चांदवड आणि निपाणी या भागातील वाड्यांमध्ये भिंतीवर चित्रे होती. पांडेश्वर, मोरगाव, पाल, बेनवडी, पुण्याजवळील पाषाण या ठिकाणांच्या मंदिरांच्या भिंतीवर चित्रे होती. या काळातील चित्रांचे विषय म्हणजे दशावतार, गणपती, शंकर, रामपंचायतन, विदर्भातील जामोद येथील जैन मंदिरातील जिन चरित्र म्हणजे महावीरांचे चरित्र, पौराणिक गोष्टी हे होत. याचा अर्थ देव-देवतांची चित्रे त्याकाळी मंदिरांत असत. रामायण, महाभारत, सण, उत्सव यांवर आधारित चित्रे असत.