बदल : भौतिक व रासायनिक

थोडे आठवा

views

2:44
आपल्या आजूबाजूला किंवा सभोवतालच्या परिसरात अनेक घटना घडत असतात. या घटना घडल्यामुळे काही तरी बदल त्या ठिकाणी होतो. पण हा बदल झाला आहे हे तुमच्या केव्हा लक्षात येईल? जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचे बारीक निरीक्षण कराल तेव्हा. उदा. दुधाचे दही होते, पाण्याचा बर्फ होतो, आपण फुगा फुगवतो, सफरचंद कापून ठेवले तर थोड्या वेळाने ते लाल पडते. यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या सभोवती नेहमी घडतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे बदल कशामुळे होतात? चला तर मग, या पाठात आपण वस्तूंमध्ये कशाप्रकारचे बदल होतात ते पाहणार आहोत. प्रथम आपण बदल म्हणजे काय? ते पाहू. आपल्या सभोवताली अशा अनेक गोष्टी असतात ज्यांच्यावर काही क्रिया झाली की त्यांच्यात बदल होतो. मुख्यत: जेव्हा पदार्थाच्या रचनेत आणि स्थितीत फरक पडतो, त्यावेळी त्या पदार्थांत बदल झाला असे आपण म्हणतो. उदा. पेन्सिल वापरली की, वारंवार टोक काढले की पेन्सिलच्या लांबीत म्हणजेच तिच्या रचनेत बदल होतो.