बदल : भौतिक व रासायनिक

परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल

views

4:57
मेणबत्ती पेटविली की, ती हळूहळू वितळून मेण तयार होते. नंतर या द्रवरूप मेणाला साच्यात टाकल्यावर ते गोठते. त्यापासून पुन्हा मेणबत्ती बनवण्यात येते.काचेच्या तुकड्याचा आकार पूर्वीसारखा परत बनवता येतो. आणि मेण देखील वितळवून पुन्हा मेण बनवता येते. म्हणूनच पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात.परिवर्तनीय बदलाचे उदाहरण म्हणजे स्प्रिंग ताणणे, पाण्याचे बर्फात रूपांतर होणे. कारण, स्प्रिंग ताणल्यानंतर पुन्हा पूर्वीसारख्या आकारात येते. तसेच बर्फाचे पाणी आणि पाण्याचे पुन्हा बर्फ तयार करता येते.परिवर्तनीय बदलाच्या विरूद्ध म्हणजे अपरिवर्तनीय बदल. म्हणजेच, जे झालेले बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाहीत, त्यांना अपरिवर्तनीय बदल म्हणतात. आपण पाहतो ना कैरीचा आंबा होतो पण आंब्याची कैरी होत नाही.अपरिवर्तनीय बदलाचे दुसरे उदाहरण म्हणजे लाकूड जळून राख होते पण राखेपासून लाकूड तयार करता येत नाही. दुधाचे दही होणे, भूकंप होणे. भाजलेल्या पोळीची पुन्हा कणीक होत नाही. हे आपल्या दैनंदिन जीवनातील काही अपरिवर्तनीय बदल आहेत.