बदल : भौतिक व रासायनिक

निरीक्षण व चर्चा:

views

4:22
पदार्थामध्ये होणारा बदल उदा दुधापासून दही तयार होणे, बर्फाचे पाणी होणे बियाला कोंब येणे हे सर्व नैसर्गिक बदल आहेत तसेच पाणी उकळणे हा भौतिक बदल आहे फटाके पेटवणे हे काम मानवनिर्मित आहे. फटाके जरी मानव फोडत असला तरी मानवाकडून केला गेलेला हा बदल रासायनिक व कायमस्वरूपी आहे.लाकूड जळून त्यांची राख होते. हा रासायनिक बदल आहे.झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गंजणे, पाऊस पडणे, विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे यातील काही बदल हे नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित आहेत.फळे झाडावरून पडणे, पाऊस पडणे, लोखंड गंजणे हे सर्व बदल नैसर्गिक बदल आहेत तर विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे हे मानवनिर्मित बदल आहेत. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक वस्तूंची गरज असते. या वस्तू बनवताना वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. मानवनिर्मित पदार्थ तयार करताना उपलब्ध पदार्थांपासून आपल्या गरजांप्रमाणे आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो. उदा. शेंगदाण्यापासून तेल तयार करणे, लाकडापासून विविध वस्तू तयार करणे इत्यादी.