बदल : भौतिक व रासायनिक

क्षरण

views

2:54
क्षरण म्हणजे गंजणे. लोखंड गंजते हे आपण नेहमीच ऐकत असतो. लोखंडाची वस्तू गंजते म्हणजे तिच्यावर विटकरी रंगाचा थर साचतो. तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो. या क्रियेस धातूचे क्षरण म्हणतात. क्षरण ही रासायनिक क्रिया आहे. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांच्या रासायनिक क्रियेमुळे गंज चढतो. म्हणजेच त्या धातूचे क्षरण होते. क्षरण झाल्याने किंवा गंजण्याने ह्या वस्तू खराब होतात, तसेच कमकुवत होतात. क्षरणामुळे आपल्या घरातील धातूंच्या वस्तू खराब होत असतील, तर त्या लोखंडी वस्तू गंजून खराब होऊ नयेत म्हणून त्या वस्तूंना रंग लावला पाहिजे. तांब्यापितळ्याच्या भाड्यांना कल्हई केली पाहिजे. कल्हई करणे म्हणजे तांब्यापितळेच्या भाड्यांवर कथिलाचा लेप देणे. क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात, त्याला गॅल्व्ह्नायझेशन असे म्हणतात. तंत्रज्ञानाच्या युगात पावडर कोटिंगसारखी नवीन पद्धती विकसित झाली आहे. पावडर कोटिंगमध्ये विविध रंगछटा असणारे लेप लोखंडी वस्तूवर दिले जातात. असेच लेप अॅल्युमिनियम धातूवर दिले जातात. त्यामुळे त्या धातूंचे क्षरण होत नाही. लाकडी वस्तूंचेही क्षरण होते. लाकडी वस्तूंचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे. त्यामुळे त्याच्यावर सहज बुरशी, वाळवी किंवा कीड लागू शकते. हा बदल नैसर्गिक परंतु अपरिवर्तनीय आहे. म्हणूनच आपण लाकडी वस्तूंना पॉलिश करायला हवे.