बदल : भौतिक व रासायनिक

भौतिक बदल व रासायनिक बदल

views

4:41
आता आपण भौतिक बदल व रासायनिक बदलांबद्दल अधिक माहिती करून घेऊ. ह्या बदलांच्या उदाहरणाचा विचार केला तर काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच कायम राहतात. त्यापासून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. अशा बदलास भौतिक बदल म्हणतात. म्हणजेच बदल होत असतानाही त्याचे संघटन कायम राहते. आणि जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रुपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्मांच्या पदार्थांत होते, अशा बदलास रासायनिक बदल म्हणतात. भौतिक बदलात आकारात, मापात, आणि अवस्थेत बदल होतो. उदा. कागदाचे तुकडे करणे. हे भौतिक बदलाचे उदाहरण आहे. या उदाहरणात कागद हा मूळ पदार्थ जसाच्या तसाच आहे फक्त तुकडे केल्याने त्याचा आकार आणि माप बदलते. तसेच भौतिक बदलात आपण ती वस्तू मूळस्वरूपात परत आणू शकतो. तुकडे झालेल्या कागदापासून एक मोठा कागद तयार करू शकतो. बर्फाचे पाणी तयार करून पुन्हा बर्फ तयार करू शकतो. याउलट आपण रासायनिक बदलात मूळ पदार्थ पुन्हा मिळवू शकत नाही. जसे कागद जाळला तर आपल्याला राख मिळते. पण राखेपासून पुन्हा कागद तयार करू शकत नाही.