बदल : भौतिक व रासायनिक

थोडे आठवा(2)

views

3:49
पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो, तेव्हा त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर म्हणतात. उदा. आपण मेणाच्या तुकड्यांना मेणबत्ती किवा स्पिरिटच्या दिव्याच्या साहाय्याने उष्णता दिली की ते वितळते. म्हणजेच त्याचे द्रवरूपात रुपांतर होते. थोड्या वेळाने हे मेण थंड झाल्यावर मेणाचा पुन्हा गोळा तयार होतो. म्हणजेच ते पुन्हा स्थायुरूप अवस्थेत जाते. या क्रियेलाच मेणाचे अवस्थांतर झाले असे म्हणतात. पदार्थांचे अवस्थांतर होतांना गोठण, संघनन, उत्कलन, विलयन अशा क्रिया होतात. कारण वरील उदाहरणात देखील मेणाचे गोठणे आणि वितळणे म्हणजेच विलयन झाले आहे. जेव्हा ते मेण गरम होते तेव्हा त्याचे उत्कलन होते आणि थंड होताना त्याचे संघनन होते. द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन होय. या बाष्पीभवनामुळेच कपडे वाळणे, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे हे शक्य झाले आहे. ही सगळी भौतिक बदलाची उदाहरणे आहेत. तसेच विरघळणे, उत्कलन, विलयन या सर्व क्रिया देखील भौतिक बदलाचीच उदाहरणे आहेत. कारण या क्रिया होताना मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलत नाहीत.