धाराविद्युत आणि चुंबकत्व

प्रस्तावना

views

4:26
आधुनिक काळात होणाऱ्या प्रगतीत विद्युत ऊर्जेचा व चुंबकाचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध उपकरणे, यंत्रे ही ऊर्जेच्या सहाय्याने चालवली जातात. आपल्या रोजच्या जीवनात आपण विद्युत उपकरणांचा व चुंबकाचा उपयोग करत असतो. चुंबकाच्या साहाय्याने अनेक प्रकारची कामे केली जातात. धातूंना आकर्षित करण्यासाठी तसेच विद्युत निर्मितीसाठी चुंबकाचा वापर केला जातो. उष्णता, प्रकाश, विद्युत, ध्वनी याप्रमाणेच चुंबक हे सुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे.काही उपकरणांमध्ये विद्युत व चुंबक या दोन्हींचाही वापर केला जातो. उदा: शीतकपाट (रेफ्रिजरेटर) फ्रिजमध्ये चुंबकाचा तसेच विद्युत ऊर्जेचाही वापर केला जातो. तर आज आपण या पाठामध्ये धाराविद्युत आणि चुंबकत्व याविषयी माहिती अभ्यासणार आहोत.