भूमितीतील मुलभूत संबोध

प्रस्तावना

views

5:48
मुलांनो, पुस्तकात तुम्हाला एक चित्र दिसत आहे. इजिप्तमधील पिरॅमिडचे हे चित्र आहे. इ.सन.पूर्व 3000 या काळात एवढया प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील? स्थापत्य शास्त्र आणि भूमिती या क्षेत्रामध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होवू शकत नाहीत. “भूमिती’’ या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. ‘भू’ म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा. अनेक देशांत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणांसाठी भूमितीचा विकास झाला असावा. यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्मांचा उपयोग ते करत होते. दोरीच्या साहाय्याने मापन कसे करावे, विविध आकार तयार कसे करावे याचा उल्लेख शुल्वसुत्रात आढळतो. नंतरच्या काळात आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रम्हगूप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली. बिंदू, रेषा व प्रतल: ज्याप्रमाणे संख्याची व्याख्या आपण करत नाही. त्याचप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत. बिंदू, रेषा, प्रतल हे भूमितीतील मूलभूत संबोध आहेत.