पायथागोरसचे प्रमेय

पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन

views

4:24
आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन पाहूया. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि काटकोन करणाऱ्या बाजू यांचा परस्पर संबंध म्हणजे काटकोनासमोरील बाजू आणि इतर दोन बाजूंमधील संबंध सांगितला आहे. त्रिकोणातील लघूकोनासामोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध तसेच विशाल कोनासामोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध पायथागोरसच्या प्रमेयाने ठरवता येतो हे आपण खालील उदाहरणांतून समजून घेवूया. उदा.1) ∠ABC मध्ये ∠C हा लघूकोन आहे, रेख AD ⊥ BC आहे. तर सिद्ध करा AB2= BC2 + AC2 – 2BC x DC आहे. (आकृती 2.23 दाखवा) शेजारील आकृतीत AB = C, AC = B, AD = P, BC = a, दिला आहे. DC = x आहे असे मानू. म्हणून BD = a – x होईल. उदा.2) ∆ ABC मध्ये ∠ACB हा विशालकोन आहे. रेख AD ⊥ रेख BC आहे. तर सिद्ध करा. AB2 = BC2 + AC2 + 2BC x CD समजा, AD = P, AC = b, AB = C आणि BC = a आहे. DC = x मानू. ∴ DB = a + x होईल.