आम्ल, आम्लारी ओळख

प्रस्तावना

views

3:49
तुम्ही विज्ञान या विषयामध्ये आम्ल व आम्लारी असे शब्द ऐकले असाल. आपल्या रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ वापरत असतो, त्यामध्ये आम्ल असते. धुण्याचा सोडा, खते, औषधी यांमध्ये आम्लारी असतात. यांमुळे पदार्थांना वेगवेगळी चव प्राप्त होते.पदार्थ गोड, कडवट, आंबट, तुरट असे चवीला असतात. चिंच, आवळा, किंवा व्हिनेगर यांसारख्या पदार्थांची चव आंबट असते. ही चव पदार्थांमध्ये असणाऱ्या विशिष्ट संयुगामुळे येते. याच आंबट चव देणाऱ्या पदार्थाला आम्ल असे म्हणतात. निळा लिटमस पेपर घेऊन आम्ल ओळखायचे असेल तर लिटमस पेपर आम्लामध्ये बुडवला तर तो तांबडा होतो. म्हणजेच, “निळा लिटमस तांबडा करणाऱ्या पदार्थांना आम्ल असे म्हणतात.’’ आम्ल हे पाण्यात विद्राव्य व क्षणकारक असतात. तसेच प्राणी आणि वनस्पतींमध्येही आम्ले असतात. खाद्यपदार्थांमध्ये आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असे म्हणतात. ही आम्ल क्षीण प्रकृतीची असतात म्हणून त्यांना सौम्य आम्ल म्हणजेच weak acid असेही म्हणतात.