माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

प्रस्तावना

views

4:10
तुम्ही मला सांगा माहिती गोळा करण्यासाठी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी, माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी तसेच संप्रेषण करण्यासाठी आपण कोणकोणत्या साधनांचा वापर करतो? मोबाईल, फोन, संगणक व नेटवर्किंग हार्डवेअर,लपटाप, डिजिटल कॅमेरा, मायक्रोफोन रेडिओ, दूरदर्शन, आंतरजाल म्हणजेच इटरनेट, उपग्रह, फक्स, ई-मेल,व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या साधनांचा वापर करतो. सुरवातीच्या काळात पत्र किंवा तार हया साधनांचा माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी वापर करण्यात येत होता. आता मात्र मानवाने इतकी प्रगती केली की काही सेकंदातच आपण माहितीची देवाण-घेवाण करू शकतो. माहितीची ही देवाण-घेवाण अतिशय जलद होण्यासाठी संगणकाची खूप मदत होते. तर या पाठामध्ये आपण संगणक व माहिती संप्रेषणाची विविध साधने याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. माहिती संप्रेषण म्हणजे ICT I = Information, C = Communication, T= Technology. अशा प्रकारे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ही संज्ञा बनली आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये साधनाद्वारे माहितीची निर्मिती, साठवणूक,प्रसारण व देवाण-घेवाण तसेच माहितीचे व्यवस्थापन व वापर केला जातो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये विविध साधनाचा वापर केला जातो. आज विज्ञान व तंत्रज्ञानाने इतक्या जलदगतीने प्रगती केली आहे की त्यामुळे माहितीचा साठा हा प्रचंड वेगाने वाढत आहे. दूरध्वनी,मोबाईल,संगणक, रेडिओ, ई-मेल, इंटरनेट, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अशी विविध माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने आहेत. या साधनांचा वापर आपण माहिती निर्माण करण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी, किंवा माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी करतो. उदा. मोबाईलद्वारे आपण इतरासोबत संभाषण करू शकतो. 2. तसेच इंटरनेटद्वारे आपण कोणतीही माहिती मिळवू शकतो.