मानवनिर्मित पदार्थ

प्रस्तावना- पदार्थ

views

3:51
दैनंदिन जीवनात आपण असंख्य वस्तू वापरत असतो. आपले जीवन सुलभ व सोयीस्कर होण्यासाठी अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित वस्तूंचा वापर आपण करत असतो. तर आता तुम्ही मला सांगा की, तुम्ही रोज सकाळपासून कोणकोणत्या वस्तू वापरता? टूथब्रश, पाणी, कपबशी, बादली, तांब्या, कपडे, ताटवाटी, पेन, पुस्तके, सायकल, खोडरबर. अशा कितीतरी वस्तू आपण रोज वापरत असतो. लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, रबर अशा अनेक पदार्थांपासून या वस्तू बनलेल्या असतात. त्या पदार्थांपैकी लाकूड, माती, खनिजे, पाणी हे पदार्थ निसर्गातून मिळतात. म्हणून या पदार्थांना ‘निसर्गनिर्मित पदार्थ’ असे म्हणतात. मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केले. या संशोधनाचा उपयोग करून संशोधकांनी कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन केले. अशा पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ काच, प्लॅस्टिक, थर्मोकोल, कृत्रिम धागे असे कितीतरी पदार्थ आपल्याला सांगता येतील.