ध्वनीचा अभ्यास

प्रस्तावना

views

05:18
ध्वनीला इंग्रजीमध्ये Sound असे म्हणतात. ध्वनी म्हणजेच आवाज. म्हणजेच ऐकण्याची संवेदना. तुमच्या कानांवर विविध प्रकारचे आवाज पडतात. हे आवाज कशामुळे ऐकू येतात? वस्तूच्या कंपनामुळे. वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ तुम्ही सतार पहिली असेल. सतारीची तार छेडली, म्हणजे त्या तारांवरून बोट फिरवले की त्यातून आवाज बाहेर पडतो. तसेच ढोलकीचा आवाज तुम्ही ऐकता. ढोलकीवर थाप मारली की त्यामध्ये कंपनामुळे आवाज निर्माण होतो. ध्वनी हे यांत्रिक कार्य घडवून आणते. त्यामुळे ते एक ऊर्जेचे रूप आहे. मुलांनो, ध्वनीची गती ही तिच्या वारंवारतेवर अवलंबून असते कारण ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते व ती तरंगावर अवलंबून असते. तर या पाठामध्ये आपण ध्वनीच्या विविध संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण ध्वनी तरंगात माध्यमाच्या कणांचे दोलन व ध्वनीप्रसारणाची दिशा यातील संबंध काय आहे ते समजून घेऊ. ध्वनीप्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनीतरंगामुळे माध्यमात संपीडन म्हणजे अधिक घनतेचे क्षेत्र व विरलन म्हणजे कमी घनतेचे क्षेत्र यांची एक शृंखला तयार होते. ही शृंखला तयार होताना अनुतरंग व अवतरंग निर्माण होत असतात. माध्यमांच्या कणांचे दोलन आपल्या मध्य स्थितीच्या आजूबाजूस तरंगप्रसारणाच्या समांतर दिशेने होते, अशा तरंगाना अनुतरंग म्हणतात.