दोन चलांतील रेषीय समीकरण

एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे

views

03:32
चलाचा लोप करण्यासाठी आणखी एक पद्धत आहे. समीकरणातील एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात काढून ती दुसऱ्या समीकरणात ठेवून पहिल्या चलाचा लोप करता येतो ही पद्धत खालील समीकरणांतून समजून घेवू. उदा1) 8 x + 3y = 11 ------- समीकरण (I) 3x – y = 2 ------- समीकरण (II) येथे समीकरण (ii) मध्ये y ची किंमत x चलात मांडणे सोपे होईल. उदा2) 3x – 4y = 16 -------- समीकरण (I) 2x – 3y = 10 -------- समीकरण (II) समीकरण (i) वरून x या चलाची किंमत y च्या रूपात मांडू. 3x – 4y = 16 -------- समीकरण (i) 3x = 16 + 4y.