दशांश अपूर्णांक

बेरीज वजाबाकी

views

2:37
दशांश अपूर्णांक : बेरीज वजाबाकी: शि: मुलांनो, तुम्ही दुकानातून स्वत:साठी काही वस्तू खरेदी करता, त्यासाठी पैशांची देवाण घेवाण करता. आणि हे करत असताना आपला दैनंदिन व्यवहारात गणिताशी सतत संबंध येत असतो. कसे ते या उदाहरणातून पहा. उदाहरण :- समजा, संदेश त्याच्या शाळेच्या वस्तू आणण्यासाठी दुकानात गेला आहे. तेथे त्याने हव्या असलेल्या सर्व वस्तूंची किंमत दुकानदाराला विचारली. रंगपेटी २० रुपये ५०पैसे, पेन्सिल ५ रुपये ५० पैसे, खोडरबर २ रुपये ५० पैसे. अशा त्या वस्तूंच्या किमती होत्या. त्याने या सर्व वस्तू एक –एक विकत घेतल्या. यासाठी जर संदेशने दुकानदाराला १०० रुपयांची नोट दिली तर त्याला किती रुपये परत मिळतील सांगा बरं? (चित्र: पुस्तकातील बिलाप्रमाणे बिल दाखवा. तर आपण सर्वप्रथम या सर्व वस्तूंचे एकच बिल तयार करूया. मुलांनो आपण जेव्हा बिल घेतो तेव्हा त्या बिलावर दिनांक असणे गरजेचे असते. त्या तारखेवरून आपल्याला केव्हाही समजू शकते की या वस्तू आपण कधी घेतल्या होत्या. नंतर ज्याने ते सामान घेतले असेल त्याचे नाव लिहावे. म्हणजे आपण इथे संदेशचे नाव लिहू. आता एका-एका वस्तूचे नाव आणि त्यांची किंमत लिहा. सर्व वस्तूंची किंमत लिहून झाल्यानंतर या सर्वांची बेरीज करा. तर पहा या सर्व वस्तूंची बेरीज झाली आहे 28 रुपये 50 पैसे. पण संदेशने तर दुकानदाराला 100 रू. दिले आहेत आणि त्याचा खर्च झाला आहे केवळ 28 रुपये 50 पैसे. मग त्याला किती पैसे परत मिळतील हे काढण्यासाठी आपण काय केले पाहिजे सांगा बरं? वि: सर 100 रू. तून 28.50 पैसे वजा करावे लागतील. शि: बरोबर. आणि हे वजा केले तर शिल्लक राहिले 71.50 म्हणून (100 - 28.50 = 71.50.) संदेशला 71.50 रुपये परत मिळतील.