दशांश अपूर्णांक Go Back एककांवरील उदाहरणे views 2:34 एककांवरील उदाहरणे : मुलांनो, 1 सेमी = 10 मिमी, 1 मीटर = 100 सेमी, 1 किलोमीटर = 1000 मीटर, 1 लीटर = 1000 मिली, 1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम, पाव किग्रॅ. = 250 ग्रॅम, अर्धा किग्रॅ = 500 ग्रॅम आणि पाऊण किग्रॅ = 750 ग्रॅम. तर अशा प्रकारची एकके असतात. यावर आधारित आपण काही उदाहरणे सोडवू उदा :- समजा, रोहनने भाजी खरेदी केली. त्यामध्ये पाऊण किग्रॅ बटाटे, एक किग्रॅ कांदे, एक पाव मटार, पाव किलो टोमॅटो होते. आणि अर्धा किलो गाजरे होती. तर त्या पिशवीतील भाज्यांचे एकूण वजन किती झाले? शि: मुलांनो, या उदाहरणातील एकूण वजन काढण्यासाठी आपण प्रथम ग्रॅमचे व किग्रॅचे एकक वापरून बेरीज करूया. यासाठी भाज्यांची वजने एकाखाली एक लिहूया. 750 ग्रॅम बटाटे +1000 ग्रॅम कांदे + 250 ग्रॅम मटार + 250 ग्रॅम टोमॅटो + 500 ग्रॅम गाजर (ही मांडणी एकाखाली एक करा. जशी आता दिली आहे तशी नको) आता आपण यांची बेरीज करूया. तर सर्व भाज्यांचे एकूण वजन झाले आहे 2750 ग्रॅम. आता हेच उदाहरण आपण किलोचे एकक वापरून दशांश अपूर्णांकात सोडवू. चला तर, याची दशांश अपूर्णांकात मांडणी करा. 0.750 किग्रॅम बटाटे + 1.000 किग्रॅम कांदे + 0.250 किग्रॅम मटार + 0.250 किग्रॅम टोमॅटो + 0.500 किग्रॅम गाजर. या सर्वांचे मिळून एकूण वजन झाले आहे 2.750 किग्रॅम. दशांश अपूर्णांकात लिहिताना भाज्यांचे एकूण वजन 2750 ग्रॅम म्हणजे 2750/1000 किग्रॅ. म्हणजेच 2.750 किग्रॅ असे लिहितात. बेरीज वजाबाकी एककांवरील उदाहरणे दशांश अपूर्णांकात आणखी काही बेरीज आणि वजाबाकीची गणिते वजाबाकीचे उदाहरण संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवणे नियम समजून घेऊया दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार दशांश अपूर्णांकांचा भागाकार