दशांश अपूर्णांक Go Back दशांश अपूर्णांकांचा भागाकार views 4:20 दशांश अपूर्णांकांचा भागाकार मुलांनो, आता पर्यंत आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार शिकलो आता आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार पाहायचा आहे. दशांश अपूर्णांकांचा भागाकार करण्यासाठी त्या दशांश अपूर्णांकाला भाजकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणावे लागते. कसे ते या उदाहरणातून पहा. (व्यस्त कोणते ते स्क्रीन वर दाखवावे) समजा आपल्याला 4.8 या दशांश अपूर्णांकाला 3 ने भागायचे आहे. तर ते कसे भागायचे ते पहा. 4.8 ला म्हणजेच 48/10 ला आपल्याला 3 ने म्हणजेच 3/1 ने भागायचे आहे. म्हणून आपण यांचा व्यस्त गुणाकार करू. आता 48/10 × 1/3 ने गुणू. आपला गुणाकार झाला 48/30 = 16/10 म्हणजेच 1.6 म्हणून 4.8 ÷ 3 = 1.6 होतात. उदा 2 : समजा 3.4 ÷ 5 यांचा भागाकार करायचा आहे. तर काय कराल सांगा बरं? वि: सर 3.4 म्हणजेच 34/10 ला 5/1 ने भागावे लागेल. यासाठी यांचा व्यस्त गुणाकार करू. म्हणजेच 34/10 ला 1/5 ने गुणू. आता हा गुणाकार होईल 34/50. आता आपण 50 ने गुणल्यावर 100 येतील अशी संख्या घेऊ. नंतर त्याच संख्येने अंश व छेदाला गुणू. म्हणून आंपण 2 ही संख्या घेतली तर आपला गुणाकार झाला छेदस्थानी 50 × 2 = 100. आणि अंशस्थानी 34 × 2= 68. (68/100) म्हणजेच 0.68. म्हणून 3.4 ÷ 5 = 0.68 हा भागाकार झाला बेरीज वजाबाकी एककांवरील उदाहरणे दशांश अपूर्णांकात आणखी काही बेरीज आणि वजाबाकीची गणिते वजाबाकीचे उदाहरण संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवणे नियम समजून घेऊया दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार दशांश अपूर्णांकांचा भागाकार