बँक व सरळव्याज

प्रस्तावना बँक

views

3:07
बँक : शि: मुलांनो, तुमच्या आसपास अनेक कार्यालये तुम्ही नेहमीच पाहत असता. हे चित्र सुद्धा अशाच एका कार्यालयाचे आहे. सांगा बरं हे चित्र कशाचे आहे? विद्यार्थी :- बँकेचे शिक्षक :- बरोबर ! या चित्रात बँकेचे कार्यालय दाखवले आहे. या कार्यालयात कोणते काम केले जाते? विद्याथी :- पैशांची देवाण–घेवाण केली जाते. शिक्षक :- अगदी बरोबर. आजच्या आपल्या दैनंदिन व्यवहारात पैशांचे स्थान फार महत्वपूर्ण आहे. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांचा उपयोग करावा लागतो. हा पैसा सुरक्षित राहावा अशी सर्वांचीच इच्छा असते. तसेच आपल्या जवळ असलेल्या पैशांत वाढ व्हावी हे ही आपल्याला वाटत असते. पैशांचे व्यवहार सुरक्षित व पारदर्शी होण्यासाठी ‘बँक’ हे एक महत्त्वाचे साधन आहे. अशा या बँकेची व तिच्या व्यवहारांची माहिती आता आपण घेणार आहोत.. मुलांनो, बँक ही पैशांचे व्यवहार करणारी एक सरकारमान्य संस्था आहे. “वित्त म्हणजे पैसा. ती पैशांचे व्यवहार सांभाळते म्हणून तिला वित्तीय संस्था असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळे व्यवसाय, नोकरी,मजुरी करणारे लोक दिसतात. हे सर्व लोक मेहनत करून पैसा कमावतात. हा पैसा सर्वांनी काळजीपूर्वक खर्च केला पाहिजे. आपण भविष्यामधील गरजांसाठी म्हणजेच मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम, व्यवसाय, शेती, या गोष्टींसाठी पैशांची बचत करतो. नियमितपणे बचत करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. कारण “हीच छोटी बचत पुढे जाऊन मोठी रक्कम बनते. आणि आपल्याला त्याचा कधीही उपयोग करता येतो. ही बचत जर आपण बँकेमध्ये केली, तर आपला पैसा सुरक्षित तर राहतोच, शिवाय त्या पैशामध्ये वाढ देखील होत जाते. म्हणजेच बँकेतील आपल्या ठेवींवर बँकेकडून आपल्याला व्याज मिळते, आणि आपल्या उत्पन्नात वाढ होते.