कोन व कोणाच्या जोड्या

प्रस्तावना

views

3:15
प्रस्तावना : मुलांनो कोन, त्रिकोण यांसारख्या भौमितिक आकारांचा व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास आपण केला आहे. कोनाचे नाव, शिरोबिंदू, कोनाच्या भुजा किंवा भुजांवरील बिंदू कसे ओळखायचे याचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केला आहे. त्यांची उजळणी आपण आज करूया .कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग : मुलांनो, आता आपण कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग या विषयी माहिती करून घेऊ. कोनाचा अंतर्भाग:- ( Interior of the angle) : दिलेल्या कोनाच्या आतील भागात असणारे बिंदू हे त्या कोनाच्या अंतर्भागातील बिंदू असतात. कोनाचा बह्यभाग:-( exterior of the angle ): दिलेल्या कोनाच्या बाहेरच्या भागात असणारे बिंदू हे त्या कोनाच्या बाह्यभागातील बिंदू असतात.