कोन व कोणाच्या जोड्या

रेषीय जोडीतील कोन

views

2:42
रेषीय जोडीतील कोन (Angles in Linear Pair) : मुलांनो आता आपण रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय? आणि तो कसा ओळखायचा हे बघू या. ज्या दोन कोनांची एक भुजा सामाईक असते आणि असामाईक भुजांनी सरळ रेषा तयार होते, त्यांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात. रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणजेच ते एकमेकांचे पूरक कोन असतात. विरुद्ध कोन:- मुलांनो, आता आपण विरुद्ध कोन म्हणजे काय ते समजून घेऊ. अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर विरुद्ध कोन म्हणजे जे दोन कोन परस्परांच्या विरुद्ध बाजूला असतात त्यांना विरुद्ध कोन म्हणतात. म्हणजेच ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला, त्याचा विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो.