युरोप आणि भारत Go Back अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध views 04:05 अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध: युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर युरोप खंडातील देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळविले. त्यांना नवीन शोध लागलेल्या या खंडातील संपत्ती मिळवायची होती. युरोपातील अनेक लोक तेथे येऊन स्थायिक झाले. ते अमेरिकेत राहू लागले. १६०७ ते १७३३ या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतींवर नावालाच वर्चस्व होते. परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने (संसदेने) अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादून या वसाहतींवर राज्य करायला सुरुवात केली. वसाहतींनी धान्य, तंबाखू, साखर इ. माल फक्त इंग्लंडला विकावा अशी इंग्लंडच्या राज्यकर्त्यांची इच्छा होती. इंग्लंडने उत्कृष्ट दर्जाचा व इंग्लंडच्या मालाशी स्पर्धा करेल असा माल तेथे निर्माण करण्यावर बंदी घातली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. इंग्लंडच्या अन्यायकारक बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे. असे वसाहतींना वाटू लागले. वसाहतींनी जॉर्ज वाशिंग्टन, थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन इंग्लंडविरुद्ध बंड पुकारले. म्हणजे इंग्लंडच्या सर्व गोष्टींना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी इंग्लंडने वसाहतींच्या विरोधात युद्ध पुकारले. यादरम्यान घडलेली एक घटना म्हणजे ‘बोस्टन टी पार्टी’ होय. वसाहतींवरील कर इंग्लंडने रद्द करावेत, वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करू द्यावा, त्यात इंग्लंड पार्लमेंटने हस्तक्षेप करु नये अशा मागण्या वसाहतीतील लोक करू लागले. इंग्लंडने याला नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला. १७७३ साली अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या इंग्लिश जहाजांवरील चहाच्या पेट्या वसाहतींतील काही नागरिकांनी समुद्रात फेकून दिल्या. याच घटनेला ‘बोस्टन टी पार्टी’ असे म्हणतात. प्रस्तावना प्रबोधनयुग भाग २ धर्मसुधारणा चळवळ युरोपातील वैचारिक क्रांती अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध फ्रेंच राज्यक्रांती भांडवलशाहीचा उदय साम्राज्यवाद बंगालमध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया इंग्रज – म्हैसूर संघर्ष