१८५७ चा स्वातंत्र्यलढा

तात्कालिक कारण

views

3:11
तात्कालिक कारण :- कोणत्याही दाबून ठेवलेल्या असंतोषाला बाहेर पडण्यासाठी निमित्त हवे असते. असे निमित्त म्हणजे त्या उद्रेकाचे तात्कालिक कारण असते. ते प्रमुख कारण नसते. १८५७ च्या उठावास कारणीभूत ठरलेली तात्कालिक गोष्ट अशी होती: ब्रिटीशांनी १८५६ साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे (गोळ्या) दिल्या. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असते, अशी बातमी सर्वत्र पसरली. गाईला हिंदू पवित्र मानतात. तर डुकराला मुस्लिम अपवित्र मानतात. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. आपला धर्म बुडविण्याचा इंग्रजांचा हा डाव आहे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी याचा जाब गोऱ्या अधिकाऱ्यांना विचारला, तेव्हा ‘ही गोष्ट साफ खोटी’ असल्याचे इंग्रजांनी सांगितले. पण शिपायांचा त्यावर विश्वास बसला नाही, त्यांचा क्रोध वाढतच गेला. या असंतोषचा पहिला उद्रेक १० मे, १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.