१८५७ चा स्वातंत्र्यलढा

बीमोड

views

4:14
बीमोड :- मुलांनो १८५७ च्या लढ्यात भारतीय आपल्या सर्व ताकदीनिशी इंग्रजांविरुद्ध लढले. इतिहासाचा बारकाईने अभ्यास केल्यास लक्षात येते की बंडवाल्यांनी बंड करण्याची तारीख ३१ मे १९५७ अशी ठरविली होती. परंतु चरबी लावलेल्या काडतुसांची घटना घडली आणि बंडाचा स्फोट अगोदरच म्हणजे १० मे १८५७ ला मीरत येथे झाला. त्यामुळे ३१ मे ला बंड करायचे आहे, ते कशा पद्धतीने असेल हे सर्वांना माहीत होण्याअगोदरच बंडाचा उद्रेक झाला. त्यामुळे बंडाचे पूर्वनियोजन होऊ शकले नाही. यानंतर अनेक लष्करी छावण्यात शिपायांनी बंडे पुकारली. पण त्यांच्या बंडांच्या हालचालीत कोणतीच सुसूत्रता राहिली नाही. त्यांच्यामधील या गोंधळाचा इंग्रजांनी फायदा उठविला. सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत गेले. परंतु इंग्रज या धक्क्यातून लवकर सावरले. त्यांची प्रशासकीय ताकद मोठी होती. इंग्रजांनी दिल्लीतील शिपायांच्या बंडाची बातमी तारयंत्राच्या साहाय्याने उत्तर हिंदुस्थानातील प्रमुख शहरांतील इंग्रज अधिकाऱ्यांना कळवून टाकली होती. इंग्रजांकडे असलेल्या या साधनाचा त्यांना खूप फायदा झाला. जी बंडाची बातमी कळण्यासाठी पूर्वीच्या काळी कित्येक आठवडे लागले असते, तेथे ती काही क्षणात जाऊन पोहोचली. अशी अवस्था बंडवाल्यांची नव्हती. तसेच इंग्रजी सैन्यही मोठे होते. जून १८५७ मध्ये इंग्रजांनी एकूण ६५ हजार फौज दिल्लीभोवती उभी केली. इंग्रजांनी उठाव मोडून काढण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा विचार केला. म्हणजेच इंग्रजांनी समझोता करून, पैशाचे आमिष दाखवून, शिक्षा करून, किंवा दुरी निर्माण करून हा उठाव मोडून काढण्यात यश मिळविले.