१८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग 2

views

3:27
१८५७ चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग २ :- लष्करी डावपेचांचा अभाव :- १८५७ च्या उठावात हिंदी बंडवाल्यांचे नेते लष्करी डावपेचात कमी पडले. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखते आले नाहीत. लढाया जिंकण्यासाठी जसे शौर्य लागते, तसे डावपेचाचेही गुण आवश्यक असतात. बंडवाल्यांनी दिल्ली जिंकल्यावर ती त्यांनी हर प्रयत्नांनी आपल्या ताब्यात ठेवणे गरजेचे होते. कारण दिल्ली ही हिंदुस्थानची पूर्वीपासूनची राजधानी, तिचा सर्व हिंदुस्थानावर प्रभाव होता. दिल्ली ज्याच्या ताब्यात त्याचे हिंदुस्थानवर राज्य हे इंग्रजांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी सर्वप्रकारचे प्रयत्न करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. दिल्लीचा लढा चालू असताना इंग्रज फौजेला पंजाबमधून सैन्य मिळत होते. हे सैन्य इंग्रजांकडे पाठविणे बंडवाल्यांना सहज बंद करता आले असते, पण त्यांना ते सुचले नाही. तसेच नानासाहेबांनी कानपूरकडून चाल करून दिल्लीच्या बंडवाल्यांना मदत करण्यास जावयास हवे होते. तेही त्यांनी केले नाही. ते कानपुरातच राहिले. तसेच उठावक-यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांजवळ तारायंत्रे, रेल्वे, पोस्ट या दळणवळणाच्या आधुनिक सोयी होत्या. त्यामुळे लांबलांबच्या बातम्यांची देवाणघेवाण जलद गतीने होत होती. यामुळेच भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. सर्वांचे लढण्याचे कारण भिन्न असल्याने त्यांच्यात एकच ध्येय आणि एकच कार्यक्रमाचा अभाव होता. साधनसामग्री अनुभव व मनोधैर्य यात इंग्रज वरचढ होते, उठावास जनतेचा हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. अशा अनेक कारणांमुळे १८५७ चा लढा अयशस्वी झाला.