सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

प्रस्तावना

views

4:37
जे हालचाल करतात, ज्यांना अन्न, पाणी, हवा यांची गरज असते त्यांना आपण सजीव असे म्हणतो. या सजीवांमध्ये मानव, वृक्ष, प्राणी, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. निसर्गामध्ये विविध प्रकारचे सजीव व सूक्ष्मजीव आढळून येतात. त्यांचा आकार, रंग, गुणवैशिष्टये ही वेगवेगळी असतात. सर्वच सजीवांमध्ये काही जीवनक्रिया सतत सुरु असतात. सजीवांना जीवन जगण्यासाठी पोषण आवश्यक असते. त्यांची वाढ होते. श्वसन, अभिसरण, उत्सर्जन, हालचाल अशा विविध क्रिया त्यांच्या शरीरात चालू असतात. ते प्रजनन करतात व त्यांचा मृत्यूही होतो. तर या पाठामध्ये आपण सजीव सूष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याविषयी अधिक विस्ताराने माहिती करून घेणार आहोत.