महाराष्ट्रातील समाजजीवन

प्रस्तावना

views

3:28
आतापर्यंत आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण करणे, लोकांवर अन्याय न होऊ देणे तसेच महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा उदार हेतू महाराजांचा होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर झाला. दक्षिणेतील जिंजीपासून ते उत्तरेतील अटकपर्यंत मराठयांनी आपले साम्राज्य विस्तारले. मराठयांची सत्ता १५० वर्षे टिकून राहिली. सामाजिक परिस्थिती :- शेती पिकविणे व शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाचे गावपातळी वरील प्रमुख साधन होते. म्हणजेच, गावात शेती व शेतीला पूरक असे जोडधंदे करून लोक आपले जीवन जगत असत. उदा. :- पशुपालन, शेतमजुरी, मेंढीपालन यांसारखे उद्योग करत. गावाचे संरक्षण करण्याची जबाबदारी गावच्या पाटलाकडे असे. पाटिलकीच्या कामासाठी पाटलास जमीन इनाम दिलेली असे. गावात गावकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा मोबदला वस्तू रूपाने बलुतेदारांना मिळत असे. एकूण १२ बलुतेदार असत. यामध्ये गुरव, कुंभार, सोनार, महार, चांभार, गवळी, जोशी, धोबी, न्हावी, कोळी, लोहार, सुतार यांचा समावेश होत असे