तारकांच्या दुनियेत

आपली सूर्यमाला

views

4:27
सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह, तारे, आहेत. तर आता आपण याच सूर्यमालेविषयी काही माहिती पाहूया. सूर्यमाला म्हणजे आकाशगंगेचा एक छोटासा भाग आहे. सूर्यमालेपेक्षा आकाशगंगा ही कित्येक जास्त पटीने मोठी आहे. आकाशगंगेमध्ये लाखो तारे आहेत. काही तारे तर सूर्यापेक्षाही मोठे आहेत. त्यातील काही तारे स्वतंत्र सूर्यमाला असलेले आहेत. आकाशगंगेमधील या ताऱ्यांमध्ये रंग, त्यांचा प्रकाश, चमकणे, त्यांचा आकार या सगळ्यांच्या बाबतीत वेगळेपण आहे. एका विशिष्ट भागात अनेक ताऱ्यांचा एक समूह दिसून येतो त्यालाच आपण ‘तारकासमूह’ असे म्हणतो. सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धुमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. आपल्या सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. आपली पृथ्वी ही देखील सूर्यमालेतील एक ग्रहच आहे. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य हा तारा आहे. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्याभोवती फिरतात. तर या पाठात आपण तारकासमूहांची माहिती घेणारच आहोत पण सर्वप्रथम आपण काही मूलभूत संकल्पनाची ओळख करून घेऊ या.