तारकांच्या दुनियेत

आकाश

views

3:36
आकाश आणि अवकाश म्हणजे एकच आहे असे काही वेळा वाटते गोलाच्या पण वास्तविक तसे नाही. तर आपण दोघांमधील फरक समजून घेऊ. आपण एखाद्या निरभ्र रात्री आकाशाचे निरीक्षण केले तर काळ्या रंगाच्या छतावर अनेक चांदण्या आपल्याला दिसतात. तर पृथ्वीच्या वातावरणाचा व त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीवरून दिसू शकणारा हा छताच्या स्वरूपात भासणारा भाग म्हणजेच ‘आकाश’ होय. आकाशामध्ये तारे, ग्रह, इत्यादी आकाशस्थ गोलाच्या दरम्यान असलेली पोकळीच्या स्वरूपातील अथांग अशी सलग जागा म्हणजेच ‘अवकाश’ होय. यामध्ये अनेक वायू, धूलिकण असू शकतात. अवकाशामध्ये अनेक ताऱ्यांचे असंख्य समूह तयार झाले आहेत.