तारकांच्या दुनियेत

सूर्याचे संक्रमण

views

3:07
आपण वेगवेगळ्या तारकासमूहांची माहिती पाहिली आहे. आता आपण सूर्याचे संक्रमण राशींमध्ये कसे होते ते एका कृतीवरून समजून घेऊया.प्रथम आपल्या वर्गातील बारा मित्र वर्तुळावर उभे करा. एक मित्र म्हणजे एक राशी व प्रत्येक मित्राला त्यांच्या राशीचे नाव असलेली पाटी द्या. वर्तुळाच्या केंद्रस्थानी एका मित्राला सूर्य म्हणून उभे करा. आणि त्या भोवती स्वतः पृथ्वी आहात असे समजून सूर्य असलेल्या तुमच्या मित्राकडे पाहत त्याच्याभोवती गोलाकार फिरत राहा. आता गोलाकार फिरत असताना सूर्याकडे पाहत असताना सूर्य तर दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारकासमूहपण दिसू शकेल. सूर्याच्या प्ररवर प्रकाशामुळे त्याच्या मागील राशी दिसत नाही पण ती राशी प्रत्यक्षात असते. यावरून असे लक्षात येते की पृथ्वी सूर्याभोवती कक्षेमध्ये फिरत असताना सूर्याच्या मागील राशी दिसत नाहीत. परंतु प्रत्यक्षात त्या राशी अस्तित्वात असतात.