तारकांच्या दुनियेत

ओळख काही तारकासमूहांची

views

5:28
आकाशात अनेक तारकासमूह आहेत, जसे सप्तर्षी, शर्मिष्ठा, मृगनक्षत्र, वृश्चिक तारकासमूह आज ह्या सर्वांची आपण माहिती पाहणार आहोत, सर्वप्रथम आपण सप्तर्षी या तारकासमूहाची माहिती करून घेऊ या. सप्तर्षी: उन्हाळ्यामध्ये रात्री आकाशात सात ता-यांची एक विशिष्ट जोडणी दिसते. त्यांनाच आपण ‘सप्तर्षी’ असे म्हणतो. हा तारकासमूह फेब्रुवारी महिन्यात रात्री 8 च्या सुमारास ‘ईशान्य’दिशेला उगवतो. मध्यमंडलावर तो एप्रिल महिन्यात असतो. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये रात्री 8 च्या सुमारास मावळतो. शर्मिष्ठा: ध्रुवतारा ओळखण्यासाठी सप्तर्षी प्रमाणेच शर्मिष्ठा तारकासमूहांचाही आधार घेतला जातो. ‘शर्मिष्ठा’ तारकासमूह पाच ठळक ताऱ्यांनी बनलेला असून M या इंग्रजी अक्षराच्या मांडणीत हे तारे आकाशात दिसतात. मृगनक्षत्र : मृगनक्षत्र हा तारकासमूह आकाशात फार तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. हा 7 ते 8 ताऱ्यांनी मिळून बनलेला तारकासमूह आहे. या ताऱ्यापैकी चार तारे हे एका चौकोनाचे चार बिंदू असतात. मृगनक्षत्राच्या तीन ताऱ्यांपासून एक सरळ रेषा काढली आहे. ही रेषा एका तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते. हा तारा म्हणजेच ‘व्याध’ तारा होय. मृगनक्षत्र डिसेंबर महिन्यात रात्री 8 च्या सुमारास पूर्व दिशेकडील क्षितिजावर उगवलेले दिसते.