तारकांच्या दुनियेत

तारकासमूह

views

4:17
आकाशामध्ये अनेक तारे आहेत व या ताऱ्यांचे अनेक ठिकाणी एकत्र गट असतात. खागोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतो. रात्रीच्या चमकत्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात नेमका तारा शोधणे आपल्याला कठीण वाटू शकते. आपल्या पूर्वजांना देखील याची जाणीव होती. म्हणूनच तारकासमुहांचे आकार लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी अगदी सोपा मार्ग अवलंबिला. काही तारकसमूहात एखाद्या प्राण्याची, वस्तूची आणि व्यक्तीची आकृती दिसते या आकृत्यांना त्या त्या काळानुसार, प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार नावे देण्यात आली. प्राचीन भारतीयांनी खगोलाची विभागणी चंद्रमार्गावरील २७ तारकासमुहात केली आणि या तारकासमूहांना नक्षत्रे असे नाव दिले. पाश्चात्त्यांनी सूर्याचा वर्षभराचा कालावधी १२ सौर राशींत विभागला. पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे 88 भाग केले आहे.