तारकांच्या दुनियेत

भासमान भ्रमण

views

2:47
पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे सूर्य फिरत असल्याचा आपल्याला आभास होतो. या सूर्याच्या भ्रमणाला ‘भासमान भ्रमण’ असे म्हणतात. सूर्याच्या भासमान भ्रमणाच्या मार्गाला ‘भासमान मार्ग’ असे म्हणतात. सूर्य पूर्व दिशेला उगवतो व पश्चिम दिशेला मावळतो. हे सुद्धा सूर्याचे भासमान भ्रमणच आहे. पृथ्वीवरून पाहिल्यावर सूर्याच्या पाठीमागे ठरावीक नक्षत्र असते. खगोलाविषयी अभ्यास करण्यासाठी खगोल विज्ञानाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत त्यांची माहिती करून घेऊ या. खगोल विज्ञानाच्या संस्था: पुणे येथील ‘आयुका’ (Inter university centre for astronomy & astrophysics) ही संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते. भारतात नवी दिल्ली, बंगळूर, अलाहाबाद, मुंबई व न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापन करण्यात आली आहेत. तिथे आकाश निरीक्षणांसंदर्भात विविध तारे व तारकसमूहांचे आभासी सादरीकरण करण्यात येते. त्यामुळे शालेय सहली दरम्यान या ठिकाणी अवश्य भेट द्यायला पाहिजे.