हरित ऊर्जेच्या दिशेने

औष्णिक- ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र

views

5:02
औष्णिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते. यात मुख्यत्वे उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ बनवली जाते. या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ऊर्जेचा प्रवाह चालत असतो. या प्रक्रियेमध्ये कोळशाचे ज्वलन करून उष्णता निर्माण केली जाते व त्या उष्णतेचा वापर करून बॉयलरमधले पाणी तापवले जाते. त्यानंतर या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत केले जाते. या वाफेमुळेच टर्बाइन फिरते व त्यामुळे टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. या वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. अशाप्रकारे विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा वापर होतो. म्हणून अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतात.