हरित ऊर्जेच्या दिशेने

पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती(Wind Energy)

views

3:39
वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की (Wind Turbine) असे म्हणतात. पवनचक्कीच्या मदतीने वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते. गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून दळण दळणे, पाणी उपसणे अशी कामे फार पूर्वीपासून केली जात होती. आता आपण पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती होताना कोणते टप्पे आहेत ते समजून घेऊ. वेगाने वाहणारी हवा ही टर्बाइनच्या पात्यावर आदळली की ती पाती फिरतात. टर्बाइनचा अक्ष, गती वाढविणाऱ्या गिअर बॉक्सने (Gear box) जनित्राला जोडलेला असतो. फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे टर्बाइन मधील गतिज ऊर्जेत रूपांतर होते व विद्युत ऊर्जा निर्माण होते. वेगवेगळ्या क्षमतेची पवन-निर्मिती यंत्रे उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1kW (किलोवॅट) पेक्षा कमी क्षमतेपासून ते 7MW (मेगावॅट) म्हणजे (700KW) (किलोवॅट) एवढया क्षमतेची पवनयंत्रे आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करायची आहे त्या ठिकाणी हवेचा वेग किती आहे यानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसवण्यात येतात. पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी हवेचा वेग हा त्या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक गोष्टीवर अवलंबून असतो. सागरी किनाऱ्यावर हवेचा वेग जास्त असतो. त्यामुळे सागरकिनारी पवन ऊर्जेपासून विद्युतनिर्मिती करण्यासाठी योग्य परिस्थिती असते. पवन ऊर्जा हा एक उत्तम ऊर्जा स्रोत आहे. परंतु पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध नसते. त्यामुळे याचा उपयोग मर्यादित आहे.