हरित ऊर्जेच्या दिशेने

पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने

views

5:29
पर्यावरणाला पूरक अशा मार्गाने विद्युत निर्मिती केली तर पर्यावरणाची हानी होणार नाही. यासाठी आपण पुढील पर्यावरण स्नेही ऊर्जेचा वापर करू शकतो. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनांपासून विद्युत निर्मिती. या पद्धतीने ऊर्जा वापरणे खूप सोयीस्कर व पर्यावरणाला उपयुक्त असे आहे. कारण या ऊर्जेचे स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगाने वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधने, हे आहेत. हे ऊर्जास्रोत शाश्वत व कधीही न संपणारे आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माणच होणार नाहीत. म्हणून या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीला पर्यावरण स्नेही ऊर्जा असे म्हणतात. यालाच हरित ऊर्जा असेही म्हणतात. नैसर्गिक वायू, खनिज तेल, कोळसा, अणु इंधन यांच्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या ऊर्जेमुळे अनेक धोके निर्माण होतात. पर्यावरण स्नेही म्हणजे हरित ऊर्जा हा एक उत्तम पर्याय समोर आला आहे. तर आता आपण या ऊर्जेविषयी माहिती घेऊ या.